पंतप्रधान मोदी यांच्या जीवनातील प्रसंगांचे कथन करणार्‍या संकेतस्थळाचे अनावरण !

असेच प्रसंग कुणाच्या जीवनात घडले असल्यास त्यांनीही याची माहिती पाठवावी, असे आवाहनही या संकेतस्थळाने केले आहे. काही स्वयंसेवकांच्या पुढाकाराने हे संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे.

युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढणे, हे सरकारच्या नियंत्रणाबाहेर ! – केंद्र सरकार

देशासाठी लागत असलेल्या इंधनातील ८० टक्के भाग आयात करावा लागतो. त्या दृष्टीने देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

३१ मार्चपासून देशात कोरोनाचे निर्बंध रहित होणार ! – केंद्र सरकार

कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र मुखपट्टी (मास्क) आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे नियम कायम असणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या कार्यक्रमातील जिज्ञासूनी सांगितले की, त्या प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ त्यांच्या दुकानामध्ये अग्निहोत्र करतात. त्यामुळे ग्राहकांनाही त्यांच्या दुकानामध्ये चैतन्याची अनुभूती येते !

इस्रायली पंतप्रधान बेनेट यांचा एप्रिलमध्ये भारत दौरा !

पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असून यामध्ये रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे पालटत असलेली भूराजकीय समीकरणे, तसेच उभय देशांमधील संबंधांना नव्या स्तरांवर घेऊन जाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलणे, हा या दौर्‍याचा उद्देश असेल.

गेल्या २ वर्षांत २० मार्च या दिवशी देशभरात कोरोनाचे सर्वांत अल्प नवे रुग्ण !

देशभरात आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या असून चौथी लाट लवकरच येईल, अशी चर्चा होत असतांना सध्यातरी परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आहे.

भारताचा ‘आर्क्टिक परिषदे’चा स्थायी सदस्य बनण्याचा प्रयत्न !

‘आर्क्टिक परिषदे’चा सदस्य बनल्यामुळे आर्क्टिक क्षेत्राचा भारताच्या हवामानावर होत असलेला परिणाम चांगल्याप्रकारे अभ्यासता येईल.

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांविषयी शंका उपस्थित करणार्‍या तस्लिमा नसरीन यांनी आधी पूर्ण इतिहास जाणून घेऊन मत व्यक्त करावे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर असा अविश्‍वास व्यक्त करणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच !

(म्हणे) ‘मिशनरी शाळांमध्ये आमच्याकडून ‘बायबल’ वाचनाची अपेक्षा करण्यात आली नाही !’ – साकेत गोखले, तृणमूल काँग्रेस

मिशनरी शाळांविषयी पुळका असलेल्या गोखले यांना चांगलेच ठाऊक असेल की, हिंदु विद्यार्थिनींना बांगड्या घालणे, कुंकू लावणे, मेंदी काढणे आदी धार्मिक कृती करण्यापासून रोखले जाते. हा नियम विद्यार्थिनींचा निवडण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा नव्हे का ?

लाच घेतल्याच्या प्रकरणी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचे प्राध्यापक महंमद खालिद मोइन यांना अटक

प्राध्यापक महंमद खालिद मोइन हे अनेक खासगी बांधकाम व्यावसायिक, वास्तूविशारद आणि दलाल यांच्या संगनमताने विविध प्रकारच्या फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले होते. लाच घेऊन ते विविध बांधकाम प्रकल्पांना बनावट प्रमाणपत्र देत होते.