(म्हणे) ‘मिशनरी शाळांमध्ये आमच्याकडून ‘बायबल’ वाचनाची अपेक्षा करण्यात आली नाही !’ – साकेत गोखले, तृणमूल काँग्रेस

(म्हणे) ‘लोकांचा निवडण्याचा अधिकार हिरावून घेणे, हा फॅसीस्टवादाचा (हुकूमशाहीचा) मूलभूत नियम !’

  • मिशनरी शाळांविषयी पुळका असलेल्या गोखले यांना हेसुद्धा चांगलेच ठाऊक असेल की, हिंदु विद्यार्थिनींना बांगड्या घालणे, कुंकू लावणे, मेंदी काढणे आदी धार्मिक कृती करण्यापासून रोखले जाते. मिशनरी शाळांचा हा नियम विद्यार्थिनींचा निवडण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा नव्हे का ? यावर गोखले चकार शब्दही का काढत नाहीत ? – संपादक
  • भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान मानवाला आनंदी, समाधानी आणि निरपेक्ष जीवन जगण्याची अलौकिक शिकवण देते. जगातील अनेक महान वैज्ञानिक, लेखक, विचारवंत यांनी भगवद्गीतेचे वेळोवेळी गुणगानच केले आहे. जगभरातील अनेक अहिंदू हे हिंदूंच्या या धर्मग्रंथाचा अभ्यास करून हिंदु धर्मानुसार आचरण करत आहेत. अशा वेळी गोखले यांच्यासारखे उपटसुंभ त्या विरोधात बोलतात यातून हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी झाले आहेत, हे लक्षात येते ! – संपादक
मिशनरी शाळांविषयी पुळका असलेले साकेत गोखले

नवी देहली – गुजरात शासनाने इयत्ता ६ वी ते १२ वी च्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीता शिकवण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्यावर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना पोटशूळ उठला आहे.

गुजरात शासनाच्या या निर्णयाचा त्यांनी ट्वीट करत विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही अनेक जण मिशनर्‍यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे. आमच्यापैकी अनेक जणांचा हा अनुभव आहे की, आम्हाला कधीच बायबलचे वाचन अथवा ते शिकण्यासाठी विचारण्यात आले नाही कि तशी अपेक्षा करण्यात आली नाही.’’

गोखले पुढे म्हणाले की, ‘संघवाल्यांना लोकांच्या वैयक्तिक अधिकारांविषयी घृणाच असते. लोकांचा निवडण्याचा आणि इच्छेनुसार कृती करण्याचा अधिकार हिरावून घेणे, हा फॅसीस्टवादाचा (हुकूमशाहीचा) मूलभूत नियम आहे.’