एन्.सी.ई.आर्.टी.कडे तिच्या पुस्तकात सतीप्रथेविषयी देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचा पुरावा नाही !

केंद्रातील भाजप सरकारने त्याच्या अखत्यारीत असणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

कोरोना अजून गेलेला नसून तो वारंवार रंग पालटत आहे ! – ‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थे’च्या प्रमुखांची चेतावणी

डॉ. विग पुढे म्हणाले, ‘‘आपण सतर्क रहायला हवे. लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवेत, तसेच लवकरात लवकर स्वतःचे लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे.

केंद्र सरकारने बोलावली काश्मीर खोर्‍यातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक !

कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच बैठक !

‘पृथ्वीराज’ चित्रपटाला विरोध करण्यासाठी चंडीगड येथे अभिनेते अक्षय कुमार यांचा पुतळा जाळला !

दुसरीकडे करणी सेनेकडून चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ हे नाव पालटून ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून १५५२६० हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

केंद्रीय गृहमंत्रालयाने सायबर गुन्ह्याच्या विरोधातील तक्रारींचे निवारण तात्काळ करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहार सुरक्षित बनवण्यासाठी साहाय्यता (हेल्पलाईन) क्रमांक १५५२६० प्रसारित केला आहे.

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये आढळली कोरोनाची सौम्य लक्षणे ! – ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालातील माहिती

लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली, अशी माहिती ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालात देण्यात आली आहे.

निर्बंध शिथिल केल्यावर नियमांचे उल्लंघन होत असल्याने तिसरी लाट भयावह ठरू शकते ! – केंद्रीय गृहमंत्रालयाला भीती

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच अन्य नागरिकांवर वचक बसत नाही आणि तेही त्याचे उल्लंघन करतात, त्यामुळे या प्रकारांना पोलीस आणि प्रशासनच अधिक उत्तरदायी आहेत !

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेचा २० जुलैला, तर १२ वीचा ३१ जुलैला निकाल !

बोर्डाने १७ जून या दिवशी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. ४०:३०:३० या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. यामध्ये ३ प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

‘आय.एम्.ए.’च्या अध्यक्षांची आव्हान याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम्.ए.चे) अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना कोणत्याही धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या संघटनेच्या मंचाचा वापर न करण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने नुकताच दिला होता.

युरोप, अमेरिका आणि चीन यांच्यामुळे जगाला हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ! – भारत

गेल्या २०० वर्षांत विशेषत: युरोप, अमेरिका यांनी, तर मागील ४० वर्षांत चीनने केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे; मात्र याच २०० वर्षांत हवामान पालटाच्या संकटात भारताचा वाटा ३ टक्के इतकाच आहे.