युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढणे, हे सरकारच्या नियंत्रणाबाहेर ! – केंद्र सरकार

नवी देहली – केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी गेल्या काही दिवसांत तीन वेळा पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती वाढल्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ‘‘रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत चाललेल्या कच्च्या तेलाच्या किमती केंद्र सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहेत.

देशासाठी लागत असलेल्या इंधनातील ८० टक्के भाग आयात करावा लागतो. त्या दृष्टीने देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत.’’