लोणावळा (पुणे) – मुंबई-पुणे महामार्गावर संशयास्पद वाटणारे २ कंटेनर पोलिसांनी कह्यात घेतले. त्यात ५७ टन गोमांस असल्याचा संशय होता. वाहनचालक आणि मालक मात्र हे मांस म्हशींचे आहे, असे सांगत होते. ही कारवाई २५ मार्च या दिवशी करण्यात आली होती. २९ मार्च या दिवशी कंटेनरमधील मांस हे गोमांस असल्याचा पडताळणी अहवाल प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कंटेनर चालक नदीम अहमद आणि नसीर अहमद यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ही वाहतूक मे. एशियन फुड्स मीन अँग्रो (न्यू भोईबुडा, सिकंदराबाद, भाग्यनगर) या आस्थापनाच्या आदेशानुसार होत होती. या आस्थापनाचे मालक महंमद कुरेशी यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गोसेवक, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदु राष्ट्र सेना, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोसवा आयोग, प्राणी कल्याण अधिकारी यांच्या एकजुटीमुळे ही मोठी कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिकागोवंश हत्याबंदी कायदा अधिक कठोर करण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते ! |