(म्हणे) ‘हिंदु धर्म म्हणजे मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना जाळ्यात अडकवण्याचे षड्यंत्र !’-स्वामी प्रसाद मौर्य

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !

पुणे येथे ‘ब्राह्मण जागृती सेवा संघा’च्‍या वतीने बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त ‘दुचाकी रॅली’चे आयोजन !

या ‘रॅली’मध्‍ये पेशवे घराण्‍याचे दहावे वंशज श्री. पुष्‍कर पेशवे हे उपस्‍थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ पिंपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्‍याला अभिवादन करून झाला. 

निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने निपाणी (कर्नाटक) येथे महारुद्र स्वाहाकारास प्रारंभ !

निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने अधिक मासाच्या निमित्ताने ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत व्यंकटेश मंदिर, गांधी चौक येथे महारुद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला असून ५ ऑगस्टला त्याचा प्रारंभ झाला.

मिरज येथे ‘श्रीविष्‍णुसहस्रनाम पठण’ कार्यक्रमात सनातनच्‍या सात्त्विक अत्तराचे वाटप !

अधिक मास अर्थात् पुरुषोत्तम मासानिमित्त ‘ब्राह्मण महिला संघ मिरज’च्‍या वतीने राघवेंद्रस्‍वामी मठात सामूहिक ‘श्रीविष्‍णुसहस्रनाम पठण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यासाठी १०० महिला उपस्‍थित होत्‍या. या सर्व महिलांना ब्राह्मण महिला संघाच्‍या वतीने १५० सनातनच्‍या सात्त्विक अत्तराच्‍या बाटल्‍या देण्‍यात आल्‍या.

ब्राह्मणांनी त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करणे आवश्यक !

हिंदु धर्मासह विविध विषयांवर ८ पुस्तके लिहिणारे आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांनी ट्वीट करून ब्राह्मणांना त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करण्याचा सल्ला दिला आहे.

स्पृश्य-अस्पृश्यतेच्या खोट्या आरोपांवरून ब्राह्मणांना केले जात आहे कलंकित !

वैदिक धर्मात स्पृश्य-अस्पृश्य याला कोणतेही स्थान नसतांना त्याच्यावरून जनतेला भुलवणार्‍या राजकीय नेत्यांचे खरे स्वरूप जाणा !

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धोरण म्हणजे ब्राह्मणविरोध !

ख्रिस्त्यांकडून केल्या जाणार्‍या ब्राह्मणविरोधाचे मूळ जाणून सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक !

आद्यशंकराचार्यांनी चारही दिशांना पीठाधिशांना नेमून अद्वैत तत्त्वज्ञानाची परंपरा अखंडपणॆ चालू ठेवली ! – प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे

आद्यशंकराचार्य यांनी केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून ४ दिशांना केलेली मठांची स्थापना, असे असाधारण कार्य केले.

मंदिरांच्या भूमींच्या लिलावाचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना नाही, तर पुजार्‍यांना देणार ! – शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री

जर मध्यप्रदेश सरकार असा निर्णय घेऊ शकते, तर देशातील अन्य राज्य सरकारे का घेऊ शकत नाहीत ? मध्यप्रदेश सरकारने याहीपुढे जाऊन मंदिरांचे झालेले सरकारीकरण रहित करून सर्व मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात द्यावीत !

हिंदूंच्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ब्राह्मणांविषयीची वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवली !

अशी पोस्ट एखाद्या हिंदूने चुकून अली यांच्या समाजाविषयी केली असती, तर आतापर्यंत त्याचे काय परिणाम झाले असते, हे वेगळे सांगायला नको !