अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सहभागी झालेल्या ‘ब्राह्मण महिला संघा’चा इतरांनी आदर्श घ्यावा !
मिरज – अधिक मास अर्थात् पुरुषोत्तम मासानिमित्त ‘ब्राह्मण महिला संघ मिरज’च्या वतीने राघवेंद्रस्वामी मठात सामूहिक ‘श्रीविष्णुसहस्रनाम पठण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी १०० महिला उपस्थित होत्या. या सर्व महिलांना ब्राह्मण महिला संघाच्या वतीने १५० सनातनच्या सात्त्विक अत्तराच्या बाटल्या देण्यात आल्या. या प्रसंगी भागवत धर्माचे प्रचारक आणि प्रसारक पू. दिलीपकाका आपटे यांचे मार्गदर्शन झाले. ‘उपनिषद वाचणे सध्याच्या काळाची आवश्यकता आहे’, असे त्यांनी या प्रसंगी सांगितले. याचे नियोजन ब्राह्मण महिला संघाच्या कार्यकारी मंडळाने केले होते. (सनातनच्या सात्त्विक अत्तराचे महत्त्व ओळखून ते भाविकांपर्यंत पोचवून ब्राह्मण महिला संघाने धर्मकार्यात हातभारच लावला आहे. सध्या अनेक ठिकाणी अधिक मासाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या ठिकाणही सनातनची विविध सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे वितरण करता येईल ! – संपादक)