पुणे – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करतांना ब्राह्मण समाजाचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुंटुबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात येत आहे. त्यामुळे या सर्वेक्षणात पर्याय निवडतांना ब्राह्मण समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.
२३ ते ३१ जानेवारी या काळात हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या वेळी ब्राह्मण कुंटुबियांना प्रश्नावलीमध्ये लाड ब्राह्मण, दैवज्ञ ब्राह्मण, भिक्षुकी ब्राह्मण, ब्रह्मभट, विश्व ब्राह्मण, जोशी ब्राह्मण असे ६ पर्याय दिलेले आहेत. बहुतांक्षी ब्राह्मणांना केवळ देशस्थ ब्राह्मण, कोकणस्थ ब्राह्मण, कण्व ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण अशीच माहिती आहे.