निपाणी (कर्नाटक) – निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने अधिक मासाच्या निमित्ताने ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत व्यंकटेश मंदिर, गांधी चौक येथे महारुद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला असून ५ ऑगस्टला त्याचा प्रारंभ झाला. यात ५ आणि ६ ऑगस्टला सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत विविध धार्मिक विधी अन् महारुद्र स्वाहाकार होईल. ७ ऑगस्टला सकाळी ८ ते ११ श्री गणेशपूजन, मुख्यदेवता पूजन आणि महारुद्र स्वाहाकार होईल. यानंतर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत प.पू. परमात्मराज राजीव महाराज आणि प.पू. आनंद महाराज यांचे आशीर्वचन होईल. दुपारी १२.३० वाजता पूर्णाहुती आणि दुपारी १ ते ३ महाप्रसाद होईल. तरी या कार्यात भाविकांनी तन, मन, धन यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने अधिवक्ता मंदार कुलकर्णी, श्री. अभय मानवी, श्री. अभय देशपांडे यांनी केले आहे.
आज शरद पोंक्षे यांचे व्याख्यान !
६ ऑगस्टला प्रख्यात अभिनेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे यांचे निपाणी येथील व्यंकटेश मंदिर, गांधी चौक येथे दुपारी ४ वाजता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन’ यावर व्याख्यान होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.