(म्हणे) ‘हिंदु धर्म म्हणजे मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना जाळ्यात अडकवण्याचे षड्यंत्र !’-स्वामी प्रसाद मौर्य

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांचे हिंदुद्वेषी विधान !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ब्राह्मणवादाची मुळे फार खोलवर रूजली आहेत. ब्राह्मण धर्मालाच ‘हिंदु धर्म’ म्हटले जात आहे. हिंदु धर्म म्हणजे मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना जाळ्यात अडकवण्याचे षड्यंत्र आहे. जर हिंदु एक धर्म असता, तर त्यात दलित आणि मागसवर्गीय यांनाही सन्मान मिळाला असता, असे विधान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले.

(देशात आदिवासी, दलित आणि मागासवर्गियांना सरपंचांपासून ते अगदी राष्ट्रपतींपर्यंत पदे मिळाली आहेत,  त्याविषयी ते बोलत का नाहीत ? कि त्यांना त्याविषयी बोलणे अडचणीचे वाटते ? समाजात तेढ निर्माण करणार्‍या अशा लोकांविरुद्ध सरकारने गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकणेच आवश्यक आहे ! – संपादक)
मौर्य पुढे म्हणाले की, आम्ही वेड्यासारखे हिंदु धर्मासाठी मेलो; मात्र ब्राह्मणवादी व्यवस्थेचे चालक आम्हाला ‘आदिवासी’ समजतात. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दलित असल्याकारणाने त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.

संपादकीय भूमिका

  • स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारखे नेत्यांच्या अशा विधानांमुळे समाजात द्वेषच पसरणार आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
  • ऊठसूठ हिंदु धर्मावर चिखलफेक करणारे असे लोकप्रतिनिधी कधी अन्य पंथियांविषयी अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !