इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष महंमद नशीद घायाळ
मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी या आक्रमणाच्या अन्वेषणासाठी ऑस्ट्रेलियाचे साहाय्य घेणार असल्याचे घोषित केले आहे. ‘हे आक्रमण नशीद यांच्यावर झाले नसून देशाची लोकशाही आणि अर्थव्यवस्था यांच्यावर झाले आहे’, असे त्यांनी म्हटले.