
मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – आषाढी वारीनिमित्त दादर (पश्चिम) येथील नायगावमधील ‘बंगाल एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी २४ जुलै या दिवशी हरिनाम दिंडी काढली. श्री विठ्ठल-रुक्मिणी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांसह अन्य संत यांच्या अत्यंत लोभस वेशभूषेत विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. गळ्यात माळा, डोक्यावर पांढरी टोपी, गळ्यात वीणा, हातात चिपळ्या, विद्यार्थिनींच्या डोक्यावर तुळशी वृंदावर अशी वारकर्यांप्रमाणे पारंपरिक वेशभूषा करून ‘हरिनामाचा गजर’ करत विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते.
इयत्ता १ ली ते ५ वी मधील, तसेच माध्यमिक वर्गातील शेकडो विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीच्या पुढे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची प्रतिमा असलेली पालखी विद्यार्थ्यांनी खांद्यावर घेतली होती. स्थानिक नागरिक कौतुकाने दिंडी पहाण्यासाठी उपस्थित होते. ‘बंगाल एज्युकेशन सोसायटी स्कूल’मधून सदानंद जाधव मार्गावरून गांधी चौकी येथून पुन्हा शाळेमध्ये दिंडी आली. भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या वेळी उपस्थित होते. भोईवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय बत्तासे, महिला हवालदार अनिता देसाई, हवालदार निनाद सातोसे, महिला पोलीस शिपाई प्रणाली डोलरे हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपस्थित होते. बंगाल एज्युकेशन सोसायटी स्कूलच्या सौ. शर्मिला दासगुप्ता आणि सहशिक्षक यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी काढण्यात आली होती. या वेळी विद्यार्थ्यांचे पालकही दिंडीमध्ये सहभागी झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून बंगाल एज्युकेशन सोसायटी स्कूलद्वारे आषाढी वारीनिमित्त प्रतिवर्षी अशा प्रकारे दिंडी काढण्यात येते.
वेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
‘भेटीलागे जीवा, लागलीसे आस ।’
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
विठ्ठल : एक महासमन्वय !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत