कामकाजाच्या चित्रफिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यास बंदी

नवी देहली – न्यायालय म्हणजे २४ घंटे चालणारी मनोरंजन वाहिनी नव्हे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. पूर्वअनुमती घेतल्याविना न्यायालयीन कामकाजाचे व्हिडिओ किंवा ऑडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यावर या वेळी न्यायालयाने अंतरिम बंदी घातली. पत्रकार हर्षिता ग्रोवर यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला.
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपिठाने हा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस किंवा संबंधित उच्च न्यायालयाचे निबंधक यांची पूर्वअनुमती घेतल्याविना न्यायालयीन कामकाजाच्या कुठल्याही चित्रफिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तथापि या आदेशामुळे प्रसारमाध्यमांच्या वृत्तसंकलनाला कोणतीही झळ पोचणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्र सरकारची बाजू मांडणारे महान्यायाभिकर्ता तुषार मेहता यांनीही या सूत्राचे समर्थन केले.
मी न बोललेल्या गोष्टी वृत्तपत्रांमध्ये माझ्या नावाने छापून आल्या होत्या ! – सरन्यायाधीश

या वेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्वतःचा अनुभव सांगतांना म्हटले की, मी स्वतः कधीही न बोललेल्या गोष्टी वृत्तपत्रांमध्ये माझ्या नावाने छापून आल्याचा अनुभव मला नुकताच आला आहे. एका प्रकरणात याचिका प्रविष्ट नसतांनाही ‘सरन्यायाधिशांनी सुनावणीस नकार दिला’ अशी चुकीची बातमी पसरवली गेल्याचे त्यांनी नमूद केले.
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !