अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार

अकोला – येथील पवन वडगावे या भाडेकरू पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. सध्या आरोपी पोलीस पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी तिला वेळीच रुग्णालयात भरती केले. मुलीची प्रकृती गंभीर असून ती कोमात आहे. तिच्यावर सध्या उपचार चालू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ पीडितेच्या नातेवाईकांसह गावकर्‍यांचे पोलीस उपविभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन चालू आहे.

लग्नाचे आमीष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. ‘पोलिसाला तातडीने अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी आंदोलकांनी दिली आहे. पोलिसांनीच आरोपीला पसार होण्यास साहाय्य केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

असे वासनांध पोलीस हे पोलीस विभागाला कलंकच ! अशांवर बडतर्फीचीच कारवाई करायला हवी !