कॉकरोच जनता पक्ष परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली यंत्रणा ! – RSS Leader Indresh Kumar

रा.स्व.संघाचे पदाधिकारी इंद्रेश कुमार यांचा आरोप

रा.स्व.संघाचे पदाधिकारी इंद्रेश कुमार

जम्मू  – देशातील राजकीय वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न चालू आहेत. सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पक्ष (सीजेपी) या दोन स्वतंत्र संस्था आहेत. सीजेपी ही परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली यंत्रणा म्हणून काम करत आहे. या  आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या राजकीय पक्षांचे स्वतःचे अजेंडे (कार्यसूची) आहेत. परकीयांच्या हातातील बाहुले बनू नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी इंद्रेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना केले. ते येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांकडून प्रारंभी नीट परीक्षेचे सूत्र  उपस्थित करण्यात आले; पण आता राजकीय लाभासाठी आंदोलनाला चुकीच्या दिशेने वळवण्यात आले आहे. देशाला विकसित, समृद्ध आणि सुशिक्षित राष्ट्र म्हणून उदयास येण्यापासून रोखण्यासाठी देशांतर्गत अन् बाह्य शक्ती या आंदोलनांना पाठिंबा देत आहेत.

संपादकीय भूमिका

जर असे आहे, तर केंद्रातील भाजप सरकारने ते पुराव्यांसह उघड करून जनतेसमोर मांडले पाहिजे !