Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्याकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ

  • ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण

  • उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यांतही अनेक ठिकाणी आंदोलन

पाटलीपुत्र (बिहार) – ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात पाटलीपुत्र आणि सिवान येथे करण्यात येणार्‍या आंदोलनाच्या वेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. सिवानमध्ये दगडफेकीत पोलीस अधीक्षक घायाळ झाले. पोलीस आंदोलकांना लाठ्यांनी पिटाळून लावत आहेत. आंदोलनात सहभागी झालेले लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

उत्तरप्रदेशातील प्रयागराज, लक्ष्मणपुरी आणि सहारनपूरसह अनेक शहरांमध्ये निदर्शने चालू आहेत. मध्यप्रदेशातील २० शहरांमध्ये निदर्शने चालू आहेत. इंदूरमध्ये आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांवर दगडफेक करणारे लोकशाही मार्गाने आंदोलन करत नाहीत, हे उघड असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करणेच आवश्यक !