मराठा आरक्षण रहित केल्याने सातारा येथे राष्ट्रवादी भवनाची तोडफोड

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय

सातारा – मराठा आरक्षण रहित केल्याने येथील राष्ट्रवादी भवनाची काचेची तावदाने (खिडक्या) फोडण्यात आली आहेत. तसेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाबाहेर काही अज्ञात व्यक्तींकडून गोवर्‍या जाळण्यात आल्या आहेत.

आमदार शशिकांत शिंदे यांनी या आक्रमणाचा निषेध करून मराठा आरक्षणाच्या लढ्यात अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी असल्याचे म्हटले आहे.