मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी सैन्याला विचारला प्रश्न
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक )

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या इस्लामी पक्ष ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम (फझल)’चे प्रमुख मौलाना फझलुर रहमान यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याच्या नेतृत्वाला लक्ष्य केले. ‘मौलाना डिझेल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या फझलुर रहमान म्हणाले की, ‘जेव्हा पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशात भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती, तेव्हा त्यांना लाज वाटली नाही का ?’ यापूर्वी मौलाना फझलुर यांनी ‘जर राजकारणच करायचे असेल, तर गणवेश सोडून निवडणूक लढवा’, असे सैन्याधिकार्यांना आव्हान दिले होते.
देशाचे रक्षण करण्याचे दायित्व जनतेचे नाही, तर पगार घेणार्या सैनिकांचे !
आतंकवादाशी लढण्यासाठी सामान्य नागरिकांचे सशस्त्र गट सिद्ध करण्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली. एका सभेला संबोधित करतांना ते म्हणाले होते की, देशाच्या रक्षणाचे दायित्व सामान्य नागरिकांचे नसून सरकारी संस्थांचे आहे. तुम्ही (सैन्य) माझ्यावर तुमच्या रक्ताचे उपकार का दाखवत आहात ? तुमच्या सैनिकांनी म्हणूनच गणवेश परिधान केला आहे. तुम्ही आमच्या घाम गाळून कमावलेल्या पैशांवर दिलेल्या करातून तुमचा पगार घेता आणि मग आम्हालाच शस्त्रे उचलून त्यांच्याशी लढायला सांगता. मी कोणताही पगार घेतलेला नाही. मी कोणतेही सशस्त्र गट बनवणार नाही.
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र