बंगालमध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्या वाहनावर आक्रमण

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आक्रमण केल्याचा आरोप

जेथे केंद्रीय मंत्री सुरक्षित नाही, तेथे सर्वसामान्य नागरिक कसा सुरक्षित असणार ? अशा घटना कशा चालू आहेत?, हे ममता बॅनर्जी यांनी सांगायला हवे !

मिदनापूर (बंगाल) – येथे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्यावर केजीटी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पंचखुडी येथे आक्रमण करण्यात आले. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेचा एक व्हिडिओ मुरलीधरन् यांनी ट्वीट करून लिहिले आहे, ‘पश्‍चिम मिदनापूरच्या दौर्‍याच्या वेळी माझ्या वाहनावर तृणमूल काँग्रेसच्या काही गुंडांनी आक्रमण केले.

(सौजन्य: ABP न्यूज )

वाहनाच्या काचा फोडल्या. माझ्या सहकार्‍यांवर आक्रमण केले. त्यामुळे मला माझा दौरा अर्धवट सोडून परत यावे लागले.’ निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची माहिती घेण्यासाठी भाजपने स्थापन केलेल्या ४ सदस्यीय समितीत मुरलीधरन् यांचा समावेश आहे.