पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर

पनवेल – २३ जुलै या दिवशी खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या अंतर्गत विविध प्रकारच्या तज्ञ आधुनिक वैद्यांकडून विनामूल्य आरोग्य सेवा आणि रक्त तपासणी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आयुष्मान भारत आणि आभा कार्ड यांची नोंदणीही या वेळी करण्यात आली. मुख्यमंत्री साहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.