पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

डॉ. मोहनजी भागवत

देहली – आजची तरुण पिढी दिशाहीन किंवा भरकटलेली नाही. त्यांना समजून घेण्यासाठी त्यांना आदेश देण्याची नव्हे, तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आम्ही तरुण होतो, तेव्हा तो आज्ञापालन करण्याचा काळ होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आजची तरुण पिढी प्रश्न विचारण्याकडे अधिक कल असलेली आहे. त्यामुळे पालक आणि ज्येष्ठ यांनी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. कुटुंबांमधील संवाद न्यून होत आहे. नव्या पिढीला आपण पुष्कळ प्रेम दिले पाहिजे. त्यांच्यासमवेत वेळ घालवण्याची आवश्यकता आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. देहलीतील जंतरमंतर मैदानावर चालू असलेल्या आंदोलनाप्रकरणी ते बोलत होते.