आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण

गडचिरोली – बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर गडचिरोली जिल्ह्यातील मरारटोला गावाचे रहिवासी आणि सीमा सुरक्षा दलाचे (बी.एस्.एफ्.चे) सैनिक सुरेश आंबडर (वय ३५ वर्षे) यांना २३ जुलै या दिवशी कर्तव्य बजावतांना वीरमरण आले. आतंकवाद्यांच्या गोळीबारात त्यांना गोळी लागली. २४ जुलै या दिवशी त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • अजून किती दिवस आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकांना हकनाक हुतात्मा होऊ द्यायचे, हे ठरवायला हवे ! 
  • एकीकडे देशात क्षेपणास्त्रांची निर्मिती होत आहे आणि दुसरीकडे बाह्य युद्ध चालू नसतांना आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकांना वीरमरण येत आहे. भारताच्या शस्त्रसज्जतेचा धाक आतंकवाद्यांना नाही, असेच यावरून सिद्ध होते. तो वाटण्यासाठी भारताने आता ठोस पावले उचलली पाहिजेत !