जम्मू-काश्मीर पोलीस जामिनावर असलेल्या आतंकवाद्यांच्या पायावर जी.पी.एस्. यंत्र लावून लक्ष ठेवणार !

आतंकवाद्यांवर वेसण घालण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा कितीही वापर केला, तरी आतंकवादी त्याच्यावरही मात करून आतंकवादी कारवाया करतात, हे अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानासह आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर धोरण नेहमीच अवलंबणे आवश्यक आहे !

सिंधुदुर्ग : कणकवली येथे एकतर्फी प्रेमातून युवतीला जाळण्याचा प्रयत्न !

चित्रपटांत दाखवतात त्या एकतर्फी प्रेमाच्या कथा काल्पनिक असतात आणि वास्तव निराळे असते एवढेही युवकांना समजत नाही का ?

गोवंशियांच्या मांसाची विक्री करणारे दोघे अटकेत ! 

त्यांच्याकडून ८ सहस्र रुपये किमतीचे ८० किलो गोवंशियांचे मांस, ५०० रुपये किमतीची कुर्‍हाड आणि सुरी असा एकूण १० सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

मुंबई पोलिसांची अपर्कीती केल्याप्रकरणी उर्फी जावेद हिच्यासह ४ जणांवर गुन्हा नोंद !

उर्फी हिने प्रसिद्धीसाठी अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात एक व्हिडिओ बनवला. ‘छोटे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फी हिला अटक केली’, असा तो व्हिडिओ होता.

उद्योगपती मुकेश अंबानी यांना ५ वेळा धमक्या देणार्‍याला अटक !

उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल करणार्‍याला मुंबई पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना ‘महादेव अ‍ॅप’कडून मिळाले ५०८ कोटी रुपये ! – अंमलबजावणी संचालनालयाचा आरोप

रायपूर येथील एका उपाहारगृहाच्या तळघरातील एका चारचाकीतून अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ३ नोव्हेंबर या दिवशी ५ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी असीम दास नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

बंगालमध्ये मुसलमान तरुणाने मंदिरात मूर्तीसमोर केली लघवी !

अशी घटना अन्य धर्मियाकडून मशिदीमध्ये करण्यात आली असती, तर एव्हाना देशभरात आगडोंब पसरला असता आणि संबंधितांचे ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे) करण्यात आले असते !

देऊळवाडा, मालवण येथे गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो तरुणांनी पकडला !

‘ही गुरे बेळगाव येथे हत्या करण्यासाठी नेण्यात येत असावीत’, असा संशय येथे उपस्थित तरुणांनी व्यक्त केला असून या ‘प्रकरणातील संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.

पुणे येथे अमली पदार्थांची विक्री करतांना ४ जणांना अटक, एकावर गुन्हा नोंद !

तरुण पिढीला अमली पदार्थांचे व्यसन लावणार्‍या तरुण गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांचे विक्री जाळे नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे !

अमेरिकेत अवैध पद्धतीने घुसलेल्या ९७ सहस्र भारतियांना एका वर्षात अटक केल्याचा दावा !

अशी आकडेवारी आणि त्यामागील कारण सांगून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव नसेल कशावरून ?