Delhi Adulterated Spices : देहलीत बनावट भारतीय मसाला उत्पादन करणार्‍या आस्थापनांवर पोलिसांच्या धाडी !

१५ टन भेसळयुक्त मसाले जप्त

नवी देहली – देहली पोलिसांनी शहरातील करावलनगरमध्ये बनावट मसाले उत्पादन करणार्‍या आस्थापनांवर धाड घातली. या वेळी मसाल्यांचे २ उत्पादक आणि १ पुरवठादार यांना अटक करण्यात आली. या धाडीत १५ टन भेसळयुक्त भारतीय मसाले जप्त करण्यात आले.

१. देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलला ईशान्य देहलीतील काही उत्पादक भेसळयुक्त भारतीय मसाल्यांचे उत्पादन आणि विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

२. पोलीस पथकाने बनावट भारतीय मसाला उत्पादन करणार्‍या २ आस्थापनांवर धाडी घातल्या. पहिल्या धाडीत आरोपी दिलीप सिंह आणि खुर्सिद मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

३. या धाडीत भेसळयुक्त हळदी पावडर, गरम मसाला पावडर, आमचूर पावडर आणि इतर कच्च्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

४. करावलनगरमधील दुसर्‍या एका आस्थापनावर धाड घातली. या वेळी सरफराजला अटक करण्यात आली असून तो भेसळयुक्त मसाल्यांच्या उत्पादनात सहभागी होता. (एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मसाले बनवले जात असतांना अन्न आणि औषध प्रशासन झोपले होते का ?