Bulldozer In Netherlands : शेकडो हमास समर्थकांना हटवण्यासाठी नेदरलँड्सने वापरली भारताची ‘बुलडोझर’ पद्धत !

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आता जगात विविध देशांमध्ये हमासच्या समर्थनार्थ तेथील मुसलमान अन् साम्यवादी आंदोलने करत आहेत. येथील अ‍ॅमस्टरडॅम विद्यापिठातही शेकडो हमास समर्थक एकत्र येऊन आंदोलन करत होते. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना बुलडोझरचा वापर करावा लागला. ७ मे या दिवशी त्यामुळेच राजधानी अ‍ॅमस्टरडॅममध्ये भारतासारखे दृश्य पहायला मिळाले. विद्यापिठात तळ ठोकणार्‍या आंदोलकांना पोलिसांनी बुलडोझरच्या साहाय्याने हटवले. या वेळी आंदोलकांवर लाठीमारही करण्यात आला. पोलीस आणि आंदोलक यांमध्ये हिंसक चकमक झाली. यानंतर १२० हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली.

१. पोलिसांनी या आंदोलनांचे वर्णन अमेरिकी विद्यापिठांमधील निदर्शनांसारखे करत म्हटले की, यामुळे अतिशय असुरक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनांत शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते आणि गाझावरील इस्रायलच्या मोहिमेच्या निषेधार्थ मोर्चा काढत होते.

२. आंदोलकांनी विद्यापिठाभोवती अडथळे (बॅरिकेड्स) लावून रास्ता रोको केला आणि घोषणाबाजी चालू केली. नाइलाजास्तव पोलिसांना बुलडोझरद्वारे हे अडथळे हटवावे लागले. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

३. या वेळी जमाव गाझामधील युद्धाच्या विरोधात घोषणा देत होता आणि इस्रायलच्या सैनिकी कारवाईचा निषेध करत होता. आंदोलक ‘आझाद पॅलेस्टाईन’ अशा घोषणा देत होते. तसेच अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठ प्रशासनाकडे इस्रायलशी संबंध तोडण्याची मागणी करत आहेत.

४. या आंदोलनाच्या आधी शेकडो हमास समर्थकांनी येथील ‘होलोकॉस्ट मेमोरियल’कडे जाण्याचा प्रयत्न करत होते.

५. आतापर्यंत अमेरिकेत २ सहस्र हमाससमर्थक यांना अटक करण्यात आली आहे.

भारताची ‘बुलडोझर’ पद्धत काय आहे ?

भारतात विशेषकरून उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलखोर आणि लव्ह जिहादी यांची बेकायदेशीर घरे पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर केला. त्यामुळे ‘बुलडोझर’ हे धर्मांधांवर कारवाईचे प्रतीक मानले जाते.

संपादकीय भूमिका

अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यानंतर आता नेदरलँड्समध्येही हमासच्या समर्थनार्थ आंदोलने होत आहेत. यातून आतंकवादी आणि साम्यवादी यांनी रचलेले कथानक (नॅरेटिव्ह) जगभरात किती खोलवर रुजले आहे, हेच लक्षात येते. इस्रायली आणि हिंदू यांनी जागतिक स्तरावर एकत्र येणे का आवश्यक आहे, हे अशा उदाहरणांतून लक्षात येते !