मध्यप्रदेश येथून अपहरण केलेल्या बालकाची पनवेल येथे सुटका !

प्रतिकात्मक चित्र

कल्याण – मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातून ६ मासांच्या बाळाचे पदपथावरून अपहरण झाले होते. त्याला ६ जणांनी कल्याणमधील शहाड येथे पळवून नेले होते. पोलिसांनी शहाड येथून अपहरणकर्त्यांना अटक केली. या आरोपींच्या माध्यमातून पनवेल येथून अपहृत बालकाची एकाच्या कह्यातून सुटका करून घेतली. या प्रकरणी एक शिक्षक, त्याची पत्नी, एक माजी विद्यार्थी आणि दोन संशयित महिला यांना पोलिसांनी अटक केली आहे. या बाळाची २३ लाख रुपयांना विक्री करण्यात आली होती.