|
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे नेते आणि अधिवक्ता जी. देवराजे गौडा यांना अटक केली आहे. गौडा यांच्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णा आणि पीडित महिला यांचे लैंगिक संबंधांचे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. देवराजे यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. देवराजे यांनी वर्ष २०२३ मध्ये प्रज्वल यांचे वडील एच्.डी. रेवण्णा यांच्या विरोधात होलेनरसीपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती.
Devaraje Arrested : भाजपचे नेते देवराजे यांना अटक
कर्नाटकमधील लैंगिक शोषणाचे प्रकरण
एका महिलेकडून देवराजे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप#PrajwalRevannavideo #Karnatakahttps://t.co/PdtlNOZYVK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2024
विशेष म्हणजे होलेनरसीपूर येथील एका महिलेनेही देवराजे गौडा यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेने १ एप्रिल २०२४ या दिवशी देवराजे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. यात म्हटले आहे की, गौडा यांनी तिची मालमत्ता विकण्यास साहाय्य करण्याच्या बहाण्याने १० मास तिचे शोषण केले.