Murder Conspiracy Nupur Rana:  हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येचा कट रचणार्‍या आणखी एकाला बिहारमधून अटक !

महंमद अली उपाख्य शहनाझने रचला होता हिंदुत्वनिष्ठ नूपुर शर्मा आणि उपदेश राणा यांना जिवे मारण्याचा कट !

पाटलीपुत्र (बिहार) – भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा, भाजपचे आमदार टी. राजा सिंह, ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके आणि हिंदु सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांच्यासह अनेक नेत्यांना जिवे मारण्याच्या कटातील महंमद अली याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील मुझफ्फरपूर येथून गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचे पाकशी संबंध असल्याचे समोर आले आहे. तो तेथील एका व्यक्तीसमवेत ‘व्हॉट्सप ग्रुप’शी जोडला गेला होता. गुजरातचा मौलाना (‘इस्लामचा अभ्यासक) सोहेल अबुबकर तिमोलही याच गटात होता. त्याला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे.

महंमद अली उपाख्य शहनाझ

२४ वर्षीय महंमद अलीला मुझफ्फरपूर येथील सक्रा येथून ११ मेच्या रात्री २ वाजता अटक करण्यात आली. सोहेलच्या अटकेनंतर गुजरातच्या विशेष शाखेचे पथक मुझफ्फरपूर येथील साक्रा येथे पोचले होते. पोलिसांनी अलीकडून भ्रमणभाष जप्त केला आहे. त्यामध्ये हिंदूंच्या देवतांची आक्षेपार्ह छायाचित्रे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो ज्या नेत्याला धमकावू इच्छित होता, त्याचा क्रमांक एका विशेष गटात जोडायचा आणि ग्रुप व्हिडिओ कॉल करायचा. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तो धमक्या देत असे. या धमक्यांमध्ये हत्येच्या धमक्यांचाही समावेश होता. त्याच्यावर अनेक हिंदु नेत्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि कट रचल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच सुरत येथून मौलाना सोहेल अबुबकर तिमोल याला अटक करण्यात आली होती. त्याच्या आधारेच आता महंमद अलीला अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचे नेतेच असुरक्षित आहेत, हे वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून समोर आले आहे. त्यामुळे ‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आवई उठवणार्‍यांना आता जाब विचारला पाहिजे !