सैन्य भरतीसाठी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षेचा पेपर फुटला !

सैन्य भरतीसाठी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडून तरुणांची आर्थिक फसवणूक करणार्‍या दोघांना सैन्याच्या गुप्तचर विभागाच्या साहाय्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

म्यानमारमध्ये सैन्याच्या गोळीबारात १८ आंदोलक ठार

सैन्याने यांगून, दावेई, मंडाले, मायैक, बागो आणि पोकोकू या शहरांमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला.

भारत शस्त्रसंधीचे पालन करील, पाकनेही तिचे पालन करावे ! – भारतीय सैन्य

गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. अशा पाकवर विश्‍वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !

गलवानमध्ये ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या संख्येविषयी प्रश्‍न विचारणार्‍या तिघा चिनी पत्रकारांना अटक !

मानवाधिकारांचा ठेका घेतलेली अमेरिकी पॉप गायिका रिहाना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या चिनी पत्रकारांविषयी आवाज उठवतील का ?

हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि देपसांग येथूनही चिनी सैन्याने माघारी जावे ! – भारताची मागणी

पँगाँग सरोवराजवळील दोन्ही देशांचे सैनिक माघारी घेण्याची कार्यवाही झाल्यावर ही चर्चा करण्यात आली. हॉट स्प्रिंग, देपसांग आणि गोग्रा येथील चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून पुढे आल्याने त्याने मागे जाण्याची मागणी भारत करत आला आहे.

पँगाँग सरोवरापासून आपण मागे हटलो, तरी वेळ आल्यास तेथे ३ घंट्यांत  पुन्हा पोचू ! – माजी सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक

कैलाश रेंजवरून परत येण्याचा अर्थ, ‘आपण त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकत नाही’, असा मुळीच होत नाही.

(म्हणे) ‘गलवान खोर्‍यातील संघर्षात आमचे ४ सैनिक मृत्यू पावले !’

चीनचे ४० ते ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा अमेरिका, रशिया आणि अन्य देशांनी केला असतांना कालपर्यंत कुणीही ठार झाला नसल्याचा दावा करणार्‍या चीनची ही स्वीकृती म्हणजे साळसुदपणाच, हे वेगळे सांगायला नको !

काश्मीरमध्ये २ चकमकीमध्ये ३ आतंकवादी ठार, तर एक अधिकारी हुतात्मा

एकेका आतंकवाद्याला ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट केल्यावरच तो नष्ट होईल !

पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांच्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांनी पाकच्या सुरक्षादलाच्या चौकीवर केलेल्या गोळीबारात पाकच्या अर्धसैनिकदलाचे ४ सैनिक ठार झाले. येथील कोहलू जिल्ह्यातील कहान भागात ही घटना घडली.

अरुणाचल प्रदेशात चीनचे गाव : किती खरे आणि किती खोटे ?

चीनच्या कोणत्याही कारवाईला प्रत्युतर देण्यासाठी भारत सर्व प्रकारे सिद्ध आहे. तरीही भारताने अधिकाधिक सिद्धता करायला पाहिजे; कारण चीनसमवेतची लढाई अनेक वर्षे चालणारी आहे. ही लढण्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहेच; परंतु देशातील अन्य राजकीय पक्षांनीही सशस्त्र सैनिकांच्या मागे ठामपणे उभे रहायला पाहिजे.