हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि देपसांग येथूनही चिनी सैन्याने माघारी जावे ! – भारताची मागणी

भारत आणि चीन सैन्यांच्या अधिकार्‍यांतील चर्चेची १० वी फेरी

अशा मागण्या करत बसण्यापेक्षा चीनला जी भाषा समजते, त्याच भाषेत त्याला समजावले, तरच तो वठणीवर येईल !

सौजन्य :WION

नवी देहली – भारत आणि चीन सैन्याच्या १० व्या कोअर कमांडर पातळीवरील  चर्चेमध्ये ‘हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि देपसांग भागांतून चीनने त्याचे सैन्य मागे घ्यावे’, अशी मागणी भारताने केली. २१ फेब्रुवारीला सकाळी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ चीनच्या सीमेतील मोल्दो येथे ही चर्चा चालू झाली होती.


पँगाँग सरोवराजवळील दोन्ही देशांचे सैनिक माघारी घेण्याच्या निर्णयाची कार्यवाही झाल्यावर ही चर्चा करण्यात आली. हॉट स्प्रिंग, देपसांग आणि गोग्रा या ठिकाणी चीनचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून पुढे आल्याने त्याने मागे जाण्याची मागणी भारत करत आला आहे.