यांगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये सैन्याने बंडखोरी करत देश नियंत्रणात घेतल्यानंतर जनतेकडून लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलन चालू आहे. या आंदोलकांवर सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात १८ जण ठार झाले, तर ३० हून अधिक जण घायाळ झाले. तसेच अनेकांना अटक करण्यात आली.
At least 18 people were killed & 30 wounded in #Myanmar today. “We strongly condemn the escalating violence against protests in Myanmar & call on the military to immediately halt the use of force against peaceful protestors,” says spox Ravina Shamdasani 👉https://t.co/nqhVYtXZfv pic.twitter.com/sAvKPwR4F7
— UN Human Rights Asia (@OHCHRAsia) February 28, 2021
ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवीहक्क आयोगाने दिली. ‘आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराचा आम्ही निषेध करतो. सैन्याने शांततापूर्ण आंदोलकांच्या विरुद्ध बळाचा वापर करू नये’, असे आवाहन करत असल्याचे आयोगाच्या प्रवक्त्या रवीना शामदासानी यांनी म्हटले आहे.
At least 18 people have been killed as police tried to disperse anti-coup rallies in several Myanmar cities on Sunday https://t.co/tBku9VDs3d pic.twitter.com/vI6rbXz39N
— BBC News (World) (@BBCWorld) March 1, 2021
गेले एक मास जनतेकडून आंदेलने चालू आहेत. ती मोडून काढण्यासाठी आंंदोलकांची धरपकड, तसेच अश्रुधूराचा वापर करण्यात आला. सैन्याने यांगून, दावेई, मंडाले, मायैक, बागो आणि पोकोकू या शहरांमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला.