नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बशीर अहमद वीरी यांनी आतंकवाद्यांना ‘शहीद’ ठरवले !  

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बशीर अहमद वीरी यांनी सोपोर येथे सैन्याने ठार केलेल्या ५ आतंकवाद्यांना ‘शहीद’ ठरवले आहे. ते म्हणाले की, हे लोक स्वतःसाठी मेलेले नाहीत, तर एक सूत्र आहे ज्यासाठी त्यांनी त्यांचे रक्त सांडले आहे आणि ते सर्व ‘शहीद’ झाले आहेत.

भारतात परतण्याचे वृत्त निराधार ! – झाकीर नाईक

जिहादी आतंकवाद्यांचे मार्गदर्शक आणि त्यांचे आदर्श असणारे राष्ट्रद्रोही झाकीर नाईक यांना मलेशिया सरकार भारताकडे सोपवणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झालेले असतांनाच झाकीर यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

सालेम सात हॅण्डग्रेनेड्स घेऊन संजय दत्तच्या घरी आला, हे चित्रपटाच्या कथानकातून का लपवले ? –  सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांचा प्रश्‍न !

‘मला आणि वडिलांना धमकी आल्यानंतर मी स्वसंरक्षणाकरिता एके ५६ रायफल घरात ठेवली होती’, ही आरोपीची गुन्ह्यातील कबुली चित्रपटात दाखवली असून हे वास्तव आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रविरोधी वक्तव्य करण्याच्या विरोधात कायदा हवा ! – अधिवक्ता पंडित शेष नारायण पांडे, गोरखपूर, उत्तरप्रदेश.

‘भारतात राहून, देशाच्या सर्व सोयीसुविधांचा लाभ घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आज देशविरोधी वक्तव्ये केली जात आहेत.

जेएनयूमध्ये देशविरोधी विचारांना खतपाणी घातले जाते ! – जेएनयूचे प्रा. डॉ. प्रवेश कुमार यांचा दावा

देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (‘जेएन्यू’मध्ये) केवळ शिक्षणच मिळत नाही, तर राष्ट्रविरोधी विचारांना खतपाणी घातले जाते. यात केवळ विद्यार्थीच नाही, तर प्राध्यापकही सहभागी आहेत, असा आरोप येथील प्राध्यापक डॉ. प्रवेश कुमार यांनी केला आहे.

मागील काँग्रेस सरकारच्या १० वर्षांच्या कारभारामुळे देशात १० कोटी अकुशल तरुण निर्माण झाले ! – प्रसिद्ध शिक्षणतज्ञ टी.व्ही. मोहनदास पै

देशभरात २१ ते ३५ या वयोगटात १० कोटी तरुण अकुशल असून त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला काहीएक उपयोग नाही, असा दावा ‘मणीपाल ग्लोबल एज्युकेशन’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ञ टी.व्ही. मोहनदास पै यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीत राष्ट्रगीताचा अवमान

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ७ जून या दिवशी येथे इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीच्या वेळी राष्ट्रगीत वाजवण्यात आले; मात्र या वेळी उपस्थित असणारे अनेक जण उभे राहिले नव्हते.

धर्मांध हुसेन शेख यांसह ‘लब्बैक सोशल फौंडेशन’ संघटनेतील कार्यकर्त्यांवर राष्ट्रीय सुरक्षा आणि आतंकवादविरोधी कायद्यांद्वारे कठोर कारवाई करावी ! 

धर्मांध हुसेन शेख याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना मारण्याची योजना आखून इचलकरंजीत ‘छोटा पाकिस्तान’ करण्याचे मनसुबे रचले आहेत….

(म्हणे) ‘देशाची राज्यघटना धोक्यात असल्याने अनेकांना असुरक्षित वाटत आहे !’ – गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव

आज आपली राज्यघटना धोक्यात असल्यानेच अनेकांना असुरक्षित वाटत आहे. निवडणूक जवळ येत असल्या कारणानेच आपण आपली राज्यघटना समजून घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे आवश्यक आहे, तसेच त्याचे रक्षण करण्यासाठी परिश्रम घेतल पाहिजेत

पाक कुलभूषण जाधव यांची सुटका करू शकतो ! – आयएस्आयचे माजी प्रमुख महंमद दुर्रानी

कथित हेरगिरी आणि आतंकवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी कारागृहात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची सुटका होऊ शकते, असे मत आयएस्आयचे माजी प्रमुख महंमद असद दुर्रानी यांनी व्यक्त केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now