भारताची अपकीर्ती करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे !

भाजपचे आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत मागणी

भाजपचे आमदार नितेश राणे

कणकवली – काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ते भारतात रहातात, भारत देशाचे अन्न खातात, येथील सर्व सुखसोयी उपभोगतात आणि बाहेरच्या देशात जाऊन भारताची अपकीर्ती करतात. हा प्रकार म्हणजे देशद्रोह आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे प्रहार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.


 आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

https://www.facebook.com/100063802789137/videos/1588161281688800


या वेळी आमदार राणे यांनी एका प्रश्नावर उत्तर देतांना सांगितले, ‘‘राहुल गांधी यांची वक्तव्ये पहाता जेवढा पाकिस्तान भारताचा द्वेष करतो, तेवढाच द्वेष राहुल गांधी हेही करू लागले आहेत. दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन यांच्यात आणि राहुल गांधी यांच्यात काय फरक आहे ? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची भूमिका आणि आताची राहुल गांधी यांची भूमिका एकच आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत हे सिद्ध होते.’’

कणकवली मतदारसंघासाठी २ सहस्र २१० कोटी रुपये निधी

या वेळी बोलतांना आमदार राणे यांनी सांगितले की, कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी राज्यशासनाने तब्बल २ सहस्र २१० कोटी रुपये निधी दिला आहे. त्यानुसार लवकरच निविदा प्रक्रिया होऊन विकास कामे चालू होतील. कामे चालू झाली, तरी त्यावर आमचे लक्ष असेल. कामाच्या दर्जावर आमचे लक्ष असेल. केवळ निधी आणणे महत्त्वाचे नसून कामे योग्य दर्जाची होत आहेत ना ? याकडेही लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि तो आम्ही ठेवणार आहोत.’’ पत्रकार परिषदेत आमदार राणे यांनी मतदारसंघात विविध विकासकामांसाठी किती प्रमाणात निधी मिळाला याची माहिती दिली.