(म्हणे) ‘मी ब्रिटनमध्ये बोलू शकतो; पण भारतीय संसदेत चीनच्या घुसखोरीचे सूत्र उपस्थित करण्याची अनुमती नाही !’-राहुल गांधी

ब्रिटनमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आणखी एक बालिश विधान !

लंडन (ब्रिटन) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ५ मार्च या दिवशी येथील हाऊंस्लो येथे १ सहस्र ५०० परदेशी भारतियांच्या समोर चीनचे सूत्र उपस्थित करून मोदी शासनावर टीका केली. ते म्हणाले की, भारतीय संसदेत चिनी सैन्याच्या भारतात चालू असलेल्या घुसखोरीचे सूत्र विरोधकांना मांडण्याची अनुमती नाही. मी ब्रिटनमध्ये हे बोलू शकतो; पण भारताच्या संसदेत नाही. हे अत्यंत लाजिरवाणे आहे.

‘इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन’च्या ‘इंडिया इनसाइट्स’ कार्यक्रमात बोलतांना गांधी म्हणाले की,

१. भारताला चीनपासून सावध रहाण्याची आवश्यकता असून चीन सीमेवर पुष्कळ सक्रीय आणि आक्रमक होतांना दिसून येत आहे.

२. भारत हा मुक्त विचारांचा देश होता; परंतु आता तो तसा नाही. आता हे सर्व उद्ध्वस्त होऊ लागले आहे. त्यामुळे आम्ही ‘भारत जोडो यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला होता.

३. देशाचा अपमान मी नाही, तर स्वत: पंतप्रधान मोदी करत आहेत.

संपादकीय भूमिका

भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांत भाजप अथवा भाजपसमर्थित सरकार असतांना आणि काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ही यांपैकी ६ राज्यांतून निर्विघ्नपणे गेलेली असतांना राहुल गांधी यांच्या या विधानावर एखादे शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवील का ?