राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २५.४.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

महंतांना सुरक्षा द्या !

उत्तरप्रदेशातील डासना येथील महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्याविषयी अतिशय चिथावणीखोर लिखाण आणि माहिती धर्मांधांकडून विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत आहे.

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

सर्व क्षेत्रांत खासगीकरण करण्यात येत असतांना केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का ? केवळ मंदिरांचा पैसा लुटण्याचे हे षड्यंत्र आहे. याविरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे.

प्रत्येक सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे ! – स्वामी कल्याण देव महाराज

कोणतेही सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे. हिंदु संस्कृतीवर कोणता आघात झाला, तर सर्व साधूसंतानी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, तरच हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होऊ शकते.

बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांकडून महंत यति नरसिंहानंद यांचा शिरच्छेद करण्याची मागणी !

राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते.

म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या

म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.

अशांवर कठोर कारवाई करा !

उत्तरप्रदेशातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांनी त्यांचा शिरच्छेद करण्याची मागणी केली.

अन्य प्रार्थनास्थळे नाहीत, तर केवळ हिंदूंची मंदिरे सरकारच्या कह्यात ! – अधिवक्ता अंकुर शर्मा, जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय, देहली

भारतीय राज्यघटनेतील कलम २६ प्रमाणे भारत सरकारला सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांना अधिग्रहित करण्याचे अधिकार असतांना आजवर केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत.

हिंदु समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर अस्वले यांच्या वतीने आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या विरोधात राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार

महंतपदावरील हिंदूंच्या एका धर्मगुरूंचा शिरच्छेद करण्याची मागणी समाजमाध्यमातून करणे हे अत्यंत धक्कादायक आहे.

भाषण स्वातंत्र्याद्वारे दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावता येत नाहीत ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या महंमद नदीम या कार्यकर्त्याला फटकारत त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला.