उत्तरप्रदेशातील डासना येथील महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्याविषयी अतिशय चिथावणीखोर लिखाण आणि माहिती धर्मांधांकडून विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत आहे. महंत नरसिंहानंद यांनी केलेल्या तथाकथित वक्तव्यामुळे ‘त्यांच्याकडून आमच्या धर्म प्रतिकांचा अवमान झाला आहे’, असा प्रचंड अपप्रचार धर्मांधांकडून होत असून ‘याला एकच शिक्षा असून ती म्हणजे डोके धडावेगळे करणे’, अशी मागणी केली जात आहे.
याविषयी सार्वजनिकरित्या घोषणा अल्पवयीन धर्मांध मुले करत रस्त्यावरून फेरी काढत आहेत. पत्रकार परिषदा घेऊन धर्मांध नेते चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. त्याही पुढे जाऊन नुकताच एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, त्यामध्ये धर्मांध नेत्यांनी त्यांच्या धार्मिक प्रमुखाचा अवमान रोखण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची सिद्धता केली आहे. ‘एक तर समोरच्याला शिक्षा करू अन्यथा आम्ही बलीदान देऊ’, असे वक्तव्य केले आहे. महंत नरसिंहानंद सरस्वती यांचे शीर धडावेगळे केलेले बॅनरही झळकावले जात आहेत. ही सर्व मोठ्या कटाचीच सिद्धता आहे, हे कुणीही सांगेल.
विखारी प्रचार
काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांच्या तथाकथित वक्तव्याविषयी असाच विखारी प्रचार करून त्यांचे शीर धडावेगळे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानंतर काही मासांनी त्यांची हत्या झाली. आताची वातावरण निर्मिती ही त्याहून अधिक धोकादायक आहे; कारण आता तथाकथित आरोप असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हिंदूंची धर्मगुरु आहे आणि स्पष्टवक्ते आहेत. अशा प्रकारे वातावरण निर्मिती करण्यात येत आहे की, फाळणीपूर्व परिस्थितीचीच आठवण होईल. जमशेदपूर येथील नूरी मरकजमधून महंत नरसिंहानंद यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. महंतांनी काय वक्तव्य केले, हे विचाराल, तर त्याविषयी किती जणांना माहिती असेल, हा प्रश्नच ! मात्र रेटून बोलले जात आहे.
फाळणीची आठवण
फाळणीच्या पूर्वी हिंदूंविरुद्ध आणि मुसलमानांसाठी स्वतंत्र प्रदेश निर्माण करण्यासाठी पुष्कळ वातावरण निर्मिती करण्यात आली. विखारी प्रचार, प्रचंड हिंदुद्वेष असे करत एक दिवस ठरवण्यात आला, तो म्हणजे ‘डायरेक्ट अॅक्शन डे’ म्हणजे प्रत्यक्ष कृतीचा दिवस. बंगालपासून उत्तरेतील राज्यांमध्ये हिंदूंची प्रचंड मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. सहस्रो हिंदु स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. ते दिवस हिंदूंसाठी आणि भारतासाठी अतिशय भयाण अन् काळेकुट्ट होते. आताच्या पाकमधून हिंदूंच्या प्रेतांनी भरलेली पूर्ण रेल्वे भारतात पाठवून प्रचंड भय निर्माण करण्यात आले. लाखो हिंदूंना ठार केल्यावर आताचे पाकि(पाप)स्तान निर्माण झाले आहे, हे विसरून कसे चालेल ? महंत नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरुद्ध निर्माण होत असलेले वातावरण पाहून फाळणीपूर्व दिवसांचीच आठवण होते. तीच भीती आता निर्माण होत आहे. आता चालू असलेला विखारी प्रचार आणि चिथावणीखोर वक्तव्याच्या फैरी थांबवल्या नाहीत, तर उद्या काय पहावे लागेल, याची कल्पनाही करता येणार नाही.
एका बाजूला समाज कोरोनाशी झुंज देत असतांना त्याला आणखी कशाची झुंज द्यावी लागेल, याची कल्पनाही नाही. महंतांचे काही बरे वाईट झाले, तर हिंदूंसाठी लढणारा एक झुंजार तपस्वी गमावल्याचे दु:ख हिंदूंना होईल. हिंदूंसाठी जीवन समर्पित करणार्या एका धर्मयोद्ध्यावर कोणताही प्रसंग येऊ नये, यासाठी सरकारकडे त्यांच्या संरक्षणाची आणि चिथावणीखोर वक्तव्ये करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली पाहिजे. हिंदूंनी गट सिद्ध करून रात्रंदिवस महंतांचे रक्षण केले पाहिजे. धर्मांधांच्या धमक्यांपेक्षा हिंदूंचे संघटन अधिक शक्तीशाली आहे, याची जाणीव धर्मांधांना करून दिली पाहिजे. जेणेकरून ते महंतांना आव्हान देण्याचा विचार सोडून देतील, तसेच देशात हिंदु नेते आणि धर्माचार्य निर्भयतेने अन् सन्मानाने जीवन जगू शकतील.