भाषण स्वातंत्र्याद्वारे दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावता येत नाहीत ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ

न्यायालयाचे हे विधान म्हणजे भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे अन् त्यांचा बचाव करणारे यांना चपराकच होय !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यघटनेने भाषण स्वातंत्र्य दिले असले, तरी याचा अर्थ असा नाही की, दुसर्‍या धर्मांच्या विरोधात बोलले जाऊ शकते आणि त्या धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या महंमद नदीम या कार्यकर्त्याला फटकारत त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला.

नदीम याने बाराबंकी येथील भाषणामध्ये अयोध्येतील श्रीराममंदिराच्या भूमीपूजनावरून धार्मिक भावना भडकावणारे भाषण केले होते. त्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.