प्रत्येक सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे ! – स्वामी कल्याण देव महाराज

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

हरिद्वार, १४ एप्रिल (वार्ता.) – कोणतेही सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे. हिंदु संस्कृतीवर कोणता आघात झाला, तर सर्व साधूसंतानी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, तरच हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होऊ शकते, असे प्रतिपादन झज्जर (हरियाणा) येथील ज्ञान गोदडी पीठाचे स्वामी कल्याण देव महाराज यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामी कल्याण देव महाराज यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वरील मार्गदर्शन केले.

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी महाराजांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा हेही उपस्थित होते.