तरंगत्या ६ कॅसिनोंकडून कचरा विल्हेवाटीसंबंधीच्या नियमांचा भंग !

दक्षिण आशिया प्रायव्हेट लिमिटेड आस्थापनाच्या लेखा अहवालात उल्लेख

  • हे स्थानिक प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?
  • नद्यांचे प्रदूषण करून शासनाला महसूल मिळवून देणारे कॅसिनो !
  • पर्यावरण रक्षणासाठी विकास प्रकल्पांना विरोध करणारे अशा कॅसिनोंविरुद्ध आवाज उठवतील का ?
प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २ फेब्रुवारी (वार्ता.) – मांडवी नदीत असलेल्या तरंगत्या ६ कॅसिनोंनी धोकादायक आणि इतर कचरा विल्हेवाटीसंबंधी वर्ष २०१९ च्या सुधारित कायद्यानुसार असलेल्या नियमांचा भंग केला असल्याचा उल्लेख ‘टीव्हीयू सूद’ दक्षिण आशिया प्रायव्हेट लिमिटेड आस्थापनाने आपल्या लेखा अहवालात केला आहे. त्यामुळे मांडवी नदीचे प्रदूषण झाल्याचे त्यांनी म्हटले.