कोल्हापूर – जिल्ह्यातील एक ‘क’वर्ग पर्यटनस्थळ आणि ६ ‘क’वर्ग यात्रास्थळांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संमती देण्यात आली. यात आजरा तालुक्यातील पांडवकालीन रामलिंग मंदिर देवालय परिसरास ‘क’वर्ग देवालय पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले. याच समवेत हसूर चंप्पू गावातील हनुमान मंदिर, हनिम्मनाळ गावातील हनुमान मंदिर, कसबा नूल गावातील श्री बीरदेव मंदिर आणि हजरत इब्राहिम चिस्तीया तीर दर्गा, हेब्बाळ कसबा नूल गावातील श्री रामलिंगेश्वर मंदिर आणि दुंडगे गावातील श्री हनुमान मंदिर यांचा समावेश आहे. पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही संमती देण्यात आली.