पुणे येथून ‘एम्.पी.एस्.सी.’ची प्रश्नपत्रिका देण्याचे आमीष दाखवणारे दोघे अटकेत !

प्रश्नपत्रिकेसाठी ४० लाख रुपयांची मागणी

पुणे – ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (‘एम्.पी.एस्.सी.’) विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका देतो. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, अशा स्वरूपाचे भ्रमणभाष करणार्‍या दीपक गायधने आणि सुमित कैलास यांना पोलिसांनी अटक केली आहे. आयोगाकडून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी या दिवशी झाली. त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका १ दिवस आधी देण्याचे आमीष दाखवणारे भ्रमणभाष विद्यार्थ्यांना करण्यात आले होते; पण पोलिसांच्या अन्वेषणातून या परीक्षेची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे निष्पन्न झाले नाही.

संपादकीय भूमिका

स्वार्थासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !