Akbar Seeta Official Suspended : ‘अकबर-सीता’ असे सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ठेवणारा वन विभागाचा अधिकारी निलंबित !

त्रिपुराच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असतांना अगरवाल यांनी वरीलप्रकारे सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ठेवल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्यावरून राज्यशासनाने कारवाई केली.

Gyanvapi Case Verdict : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा चालूच रहाणार !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाचा आक्षेप फेटाळला ! न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी हिंदु आणि मुसलमान पक्षकारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर १५ फेब्रुवारी या दिवशी या संदर्भातील निर्णय राखून ठेवला होता.

SIMI Terrorist Arrested : २२ वर्षे पसार असणारा सिमीचा आतंकवादी अटकेत !

तो सिमीच्या मासिकाचा संपादकही होता. हनीफ शेख वर्ष २००२ पासून पसार होता. तो भुसावळ येथे स्वतःची ओळख लपवून रहात होता. येथे एका उर्दू शाळेत शिक्षक झाला होता.

Akbar The Rapist : मुलींवर बलात्कार करणार्‍या अकबराची माहिती अभ्यासक्रमातून वगळणार !

अकबरला महान म्हणणार्‍यांना चपराक ! केंद्र सरकारने त्याच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांमधूनही मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळून त्यांची आक्रमक आणि अत्याचारी मानसिकता यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे !

छत्तीसगडमध्ये सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार !

राज्यातील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण अलसेला यांनी सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानात असतांना कोयलीबेडा भागातील जंगलात ही चकमक झाली.

‘शिवगर्जना’ महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महानाट्याला प्रारंभ झाला.

अल्पवयीन तरुणीवर बलात्कार आणि वेश्याव्यवसाय करण्यासाठी बळजोरी !

नैतिकतेचा र्‍हास झाल्याचे उदाहरण ! अशा घटना वारंवार घडत राहिल्यास महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ? अशा आरोपींना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक !

शरद पवार गटाच्या ९ कार्यकर्त्यांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

अजित पवार यांनी ७ मासांपूर्वी राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. पक्षातील प्रमुख नेत्यांना समवेत घेऊन ते भाजप – शिंदे गटाच्या सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्हही अजित पवारांना सोपवले होते.

Bangladeshi Infiltrators In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलीस कोठडी

देशात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरता केंद्रशासन, राज्यशासन, तसेच पोलीस महासंचालक या कार्यालयांकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही चालू करण्यात आली होती.

मुंबई येथे अजय महाराज बारसकर यांच्यावर मराठा आंदोलकांचा आक्रमणाचा प्रयत्न !

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या ३ दिवसांपासून उभयतांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत.