पुणे – एका १७ वर्षीय तरुणीचे वडील आजारी असल्याने उपचारासाठी तिने शेजारी रहाणार्या सौ. पूनम माने (वय २२ वर्षे) आणि आकाश माने (वय २४ वर्षे) यांच्याकडून ३० सहस्र रुपये उसने घेतले होते; परंतु जेव्हा आकाशने पैसे परत मागितले, तेव्हा तरुणीकडे पैसे नव्हते. त्यामुळे आरोपी दांपत्याने तरुणीचे अपहरण करून तिला के.के. मॉल जवळच्या लॉजमध्ये डांबून ठेवले आणि आकाश माने याने तिच्यावर वारंवार बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिला देहविक्रीस भाग पाडून पैसे कमावले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पूनम माने हिला पोलिसांनी कह्यात घेतले असून आकाश माने फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकानैतिकतेचा र्हास झाल्याचे उदाहरण ! अशा घटना वारंवार घडत राहिल्यास महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ? अशा आरोपींना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक ! |