राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी दिली माहिती !
बलोत्रा (राजस्थान) – अकबर हा आक्रमक आणि बलात्कारी होता. तो मीना बाजार (महिलांकडून चालवण्यात येणारा बाजार. अकबरने हा बाजार चालू केला होता) भरवायचा आणि सुंदर मुलींना समवेत घेऊन जायचा. त्यानंतर तो त्या मुलींवर बलात्कार करायचा. अशा अकबराला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रमात पालट करून अशा गोष्टी दूर केल्या जातील, अशी माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
Details of the rapist Akbar is set to be excluded from the syllabus !
Information received from Rajasthan's Education Minister Madan Dilawar !
This is a tight slap to those who say 'Akbar The Great' ! The Union Government should omit lessons glorifying Mughals from the… pic.twitter.com/bsWJxq9h6c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 27, 2024
सरकारी शाळामध्ये प्रतिदिन सूर्यनमस्कार घालण्याचा आदेश !
शिक्षणमंत्री मदन दिलावर पुढे म्हणाले की, राज्यातील सरकारी शाळांमध्ये प्रार्थना सभांमध्ये प्रतिदिन सूर्यनमस्कार घालण्यात येणार आहे. त्यासाठी सूचना देण्यात आली आहे. याविषयी आढावा बैठकही घेण्यात येणार आहे. मुलांना प्रतिदिन सूर्यनमस्कार करायला लावावेत, असे आवाहन शिक्षक आणि कर्मचारी यांना करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाअकबरला महान म्हणणार्यांना चपराक ! केंद्र सरकारने त्याच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांमधूनही मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळून त्यांची आक्रमक आणि अत्याचारी मानसिकता यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे ! |