पिंपरी (पुणे) शहरात कोयता गँगची दहशत चालूच !

भोसरीतील वर्दळीच्या राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली नुकतेच दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत ३ जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला मारहाण करत लुटले.

डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे १८ ते २० जानेवारीला पुणे येथे आयोजन ! – मुरलीधर मोहोळ, माजी महापौर

रामजन्मभूमीवर होणार्‍या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर डॉ. कुमार विश्वास यांच्या वाणीतून ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन १८ ते २० जानेवारी या कालावधीत एस्.पी. कॉलेजच्या मैदानावर सर्वांसाठी विनामूल्य करण्यात येणार आहे.

जोगेश्‍वरी येथील शाळेत मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्‍याविषयी प्रबोधन !

पालकांना निमंत्रित करून त्‍यांनी त्‍यांच्‍या मुलांना मराठी माध्‍यमात घालण्‍याचा निर्णय किती अचूक आणि योग्‍य आहे ?, हे सांगण्‍यात आले. या वेळी या शाळेतून उत्तीर्ण होऊन विदेशात स्‍थायिक झालेल्‍या किंवा मोठ्या पदावर असणार्‍या विद्यार्थ्‍यांविषयी या वेळी माहिती देण्‍यात आली.

पोषण आहारापासून वंचित ५८ लाख बालके, तसेच १० लाख गर्भवती महिला आणि स्‍तनदा माता यांवर परिणाम !

राज्‍यातील बालके आणि महिला यांच्‍या आरोग्‍याची हानी करून अंगणवाडी सेविकांना काय मिळणार ? मानधनवाढीसाठी संप न पुकारता सनदशीर मार्गाचा अवलंब करावा !

मराठवाड्यात अजून २ दिवस पाऊस !

पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेत वाढलेली थंडी, ईशान्येकडील आर्द्रतायुक्त वारे आणि दक्षिणेकडून वहाणार्‍या वार्‍यांच्या संयोगातून महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे शहरामध्‍ये केवळ ३९८ विनाअनुमती बांधकामांची नोंद !

असे असेल, तर संबंधित अधिकार्‍यांनाच शिक्षा द्यायला हवी ! असे झाल्‍यास कधीतरी समाजाला शिस्‍त लागेल का ?

नागपूर येथे पीएच्.डी. फेलोशिप परीक्षेचा पेपर फुटल्‍याचा आरोप !

बार्टी, सारथी आणि महाज्‍योती या संस्‍थांच्‍या माध्‍यमातून ‘पीएच्.डी.’धारक विद्यार्थ्‍यांना दिल्‍या जाणार्‍या ‘फेलोशिप’साठी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे चाळणी परीक्षा घेण्‍यात आली होती.

मिळकतकराची थकबाकी वसूल करण्‍यासाठी महापालिकेने ३२ मिळकतींचा लिलाव करण्‍याचा निर्णय !

यामधून १६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली जाणार असली, तरी त्‍याचे मूल्‍य २०० कोटी रुपये आहे. महापालिकेचे उत्‍पन्‍न वाढवण्‍यासाठी महापालिकेने थकबाकीदारांच्‍या २०२ मिळकतींचा लिलाव करण्‍याचा निर्णय घेतला.

पुणे येथून सुटणार्‍या महत्त्वाच्या गाड्या २५ दिवस रहित !

पुणे  येथून सुटणार्‍या १६ एक्सप्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत.‘प्रवाशांनी गाडीची चौकशी केल्याविना तिकीट काढू नये’, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

केंद्रीय अन्‍वेषण विभागाच्‍या १२ ठिकाणी धाडी !

केंद्रीय अन्‍वेषण विभागाने मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्‍सर अशा १२ ठिकाणी धाडी घातल्‍या. यात अन्‍वेषण पथकांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्‍ट्रॉनिक पुरावे जप्‍त केले आहेत.