पोलीस चौकीसमोरील दुकानातून चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून ३० सहस्र रुपये लुटले !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील सरेशम बाजारातील पिझ्झा दुकानावर २ चोरांनी बंदुकीचा धाक दाखवून ३० सहस्र रुपये लुटून नेले. विशेष म्हणजे या दुकानासमोरच पोलीस चौकी आहे. पोलीस आता येथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! पोलीस चौकीसमोर चोरी करण्याचे चोरट्यांचे धाडस होते, याचा अर्थ पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आणि धाक नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !