१ लाख रुपयांची लाच घेतांना साहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपाई अटकेत !

नया नगर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायाला ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक केली.

अभिनेते शाहरूख खान याला धमकी !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शाहरूख खान याला धमकी मिळाली आहे. ‘५० लाख रुपये न दिल्यास ठार करीन’, असे धमकी देणार्‍याने सांगितले.

राज्यघटना म्हणजे राहुल गांधी यांना पोरखेळ वाटला का ? – सौ. चित्रा वाघ, नेत्या, भाजप

चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘राहुल गांधी तुम्ही लोकसभा निवडणुकीपासून हातात राज्यघटना घेऊन ‘राज्यघटना वाचवा’ म्हणून जो काही कांगावा करत आहात

मुंबईतून पाँडिचेरीत आलेल्या अल्पवयीन मुलीवर ७ जणांकडून बलात्कार

मुली आणि महिला यांच्यासाठी सर्वच ठिकाणे सध्या असुरक्षित झाली आहेत, हे वास्तव ओळखून त्यांनी वेळीच सतर्क रहायला हवे ! 

आळंदीतील कार्तिकी यात्रा काळात भाविकांची असुविधा टाळणार ! – दौन्डे, प्रांताधिकारी

आळंदीत कार्तिकी यात्रा अर्थात् ‘माऊली’च्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या सिद्धतेचा नियोजन पूर्व आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी दौन्डे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी नगर परिषद सभागृहात आढावा बैठक झाली.

मराठी माणसाचे कर्तृत्व वाढले, तरच मराठी भाषा मोठी होईल !

साहित्यिक रामदास फुटाणे म्हणाले की, मराठी भाषेचे आपणच मारेकरी आहोत. आपणच आपली मुले मराठी शाळांमधून शिकवली नाहीत, तर समाजापुढे काय आदर्श ठेवणार ?

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिष्णोई यांची छायाचित्रे असलेल्या टी-शर्ट आणि वस्तू ची विक्री !

अशा ‘टी-शर्ट’ आणि वस्तू यांची विक्री म्हणजे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार होय ! यांचे उत्पादन करणार्‍यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे अन्य कुणी असे धाडस करणार नाही !

हिंदूंनो, सर्व मतभेद विसरून संघटित व्हा अन् मतदान करा ! – नितेश राणे, प्रवक्ते, भाजप

हिंदूंना त्यांचा धर्म विसरायला लावण्यामागे ब्रिटीश आणि त्यांच्यानंतर काँग्रेसचेच हात असल्याने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी महाराष्ट्रातील हिंदूंनो, कटीबद्ध व्हा !

‘Vande Bharat’ Ridiculous Instructions : ‘वन्दे भारत’ रेल्वेमध्ये हिंदी आणि मराठी भाषांतील एकत्रित हास्यास्पद सूचना !

सर्वसुविधांनी युक्त आणि अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करण्यात आलेल्या ‘वन्दे भारत’ रेल्वेमधील डब्यांमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सूचनांमध्ये मात्र शब्दांच्या असंख्य चुका !

Indian Consulate Cancelled Toronto Camps : भारतीय दूतावासाच्या शिबिरांना सुरक्षा देण्यास नकार

पुढील वर्षी कॅनडातील निवडणुकीत भारतविरोधी ट्रुडो सरकार पाडण्यासाठी तेथील जनतेने प्रयत्न करावेत, यासाठी तेथील भारतीय वंशाच्या नागरिकांनी चळवळ राबवण्याची आवश्यकता आहे !