आईशी भांडून घरातून निघून गेली होती मुलगी !

मुंबई – नातेवाईकांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबई येथून पाँडिचेरी येथे आलेल्या १६ वर्षांच्या मुलीचे तिच्या आईसमवेत भांडण झाले. संतप्त झाल्याने रात्री ९ वाजता ती घरातून निघून गेली. यानंतर काजा मोहिद्दीन या रिक्शाचालकाने तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला चेन्नईला नेऊन २ दिवस डांबून ठेवण्यात आले. तेथे ६ पर्यटकांनी तिच्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणी रिक्शाचालक काजा मोहिद्दीनला अटक केली असून ३ पर्यटकांनाही पकडले आहे. उर्वरित तिघांचा शोध चालू आहे.
काजा मोहिद्दीनने मुलीला दारू पाजली आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तेथील समुद्रकिनार्यावर फिरतांना काही पर्यटकांनी गैरफायदा घेऊन तिला एका खोलीवर नेले. दारू पाजून आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या पालकांनी ती हरवल्याची तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. तेव्हा ती अतिशय अशक्त आणि कृश झाली होती. काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला रुग्णालयात भरती केले. बरे वाटल्यावर तिने सर्व घटना सांगितल्यावर अत्याचाराचा उलगडा झाला.
संपादकीय भूमिका
|
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !