भाईंदर – नया नगर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायाला ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक केली. नोंदवण्यात आलेल्या एका गुन्ह्याचे प्रकरण बंद करण्यासाठी पोलिसांनी लाच घेतली होती. साहाय्यक पोलीस निरीक्षक अमित आव्हाळ आणि पोलीस शिपाई प्रकाश पाटील अशी त्यांची नावे आहेत. आव्हाळ यांनी तक्रारदाराकडे साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर १ लाख रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते.
संपादकीय भूमिकापोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार होय ! अशा भ्रष्ट पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! |