पूरग्रस्त भागात कर्तव्य बजावलेले पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यासाठी आरोग्य शिबिर !

शिबिराच्या प्रसंगी डावीकडून तिसरे प्रशांत साळोखे, श्री. शीतल धनवडे (मध्यभागी) आणि अन्य मान्यवर

कोल्हापूर – जिल्ह्यात नुकत्याच उद्भवलेल्या पूरस्थितीत कर्तव्य बजावलेले प्रसार माध्यमांतील पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्या आरोग्य पडताळणीसाठी ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’च्या विशेष सहकार्याने ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे आरोग्य शिबिर पार पडले. या वेळी ‘प्रसारमाध्यमांतील सर्वांना यापुढेही मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता विभाग आणि ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’कडून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल’, अशी ग्वाही ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता विभागा’चे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रशांत साळोखे यांनी दिली. या वेळी ‘कोल्हापूर प्रेस क्लब’चे अध्यक्ष श्री. शीतल धनवडे, संचालक दीपक जाधव, सचिन सावंत, कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात ‘लॅप्टोस्पायरोसिस’, ‘धनुर्वात’ आदी लसी, तसेच औषधे देण्यात आली.